यांचा हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन...
अयोध्येतील प्रस्थावित राम मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. आज पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान मोदी 5 ऑगस्टला सकाळी 11 ते 1.10 पर्यंत अयोध्येत राहणार असून मंदिराच्या भूमीपूजनाबरोबरच ते शरयू नदीचे पूजनही करणार आहेत. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपासून भूमीपूजनाच्या धार्मिक कार्यक्रमला प्रारंभ होणार आहे. यावेळी सर्व साधू,संत तसेच राम मंदिराच्या उभारणीसाठी कार्यरत राहिलेल्या नेते मंडळींची यावेळी उपस्थिती राहणार आहे. राम मंदिराच्या संदर्भातील वाद संपल्याशिवाय मी अयोध्येत येणार नाही, असे मोदी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार ते यापूर्वी आलेही नव्हते. त्यामुळे हा त्यांचा पंतप्रधान झाल्यानंतरचा पहिलाच दौरा आहे.